खो-खो – पारंपरिक खेळ, नवे भविष्य!

Townsol Admin

June 16, 2025

खो-खो हा भारताचा पारंपरिक खेळ, ज्यामध्ये चपळता, बुद्धिमत्ता, आणि संघभावना हे शस्त्र असतात. हा खेळ अनेक पिढ्यांपासून खेळला जातोय, पण आधुनिक काळात करिअर म्हणून त्याला फारसं महत्त्व दिलं गेलं नाही आणि त्यामुळे त्याची लोकप्रियता कमी झाली. 

परंतु, हा खेळ आजही तितकाच आरोग्यदायी आणि मनोरंजक आहे. अगदी कमी खर्चात हा खेळ 
कोणत्याही गावात सुरू करता येतो. त्याचबरोबर हा खेळ: 
 

  • हृदयाची कार्यक्षमता सुधारतो 
  • शरीरातील लवचिकता आणि चपळता वाढवतो 
  • संघभावना निर्माण करतो 
  • मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत करतो 

सर्वात महत्वाचे म्हणजे खेळाडू जर खरोखरच तरबेज असेल, चकवा चकवीमध्ये प्रवीण आणि इतर खेळाडूंबरोबर समन्वय साधून खेळायची कला असेल तर तो खेळ खरंच प्रेक्षणीय आणि मनोरंजनात्मक होतो.  

आजही असे खेळाडू आहेत पण ते कदाचित छोट्या मोठ्या शहरातच, असे आम्हाला वाटते,  म्हणजेच खो खो माहित नसलेले बरेच तरुण मंडळी खेडोपाड्यात अजूनही असतील कि ज्यांच्यामध्ये खो खो खेळण्याची क्षमता असू शकेल फक्त त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे.  

आमचा तोच प्रयत्न आहे. आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलं मुलीनीं खो खो खेळामध्ये सामील व्हावे.  

त्यासाठी असलेल्या अडचणी, प्रश्न, संधी ह्यावर इथे आपण सविस्तर चर्चा करूया. यशस्वी मान्यवरांचे मार्गदर्शन घेऊया.  

तुम्हाला चर्चा करावीशी वाटतात असे विषय इथे मांडूया तसेच खाली दिलेले विषयांच्या चर्चेमध्ये सहभागी होऊया.  

Share your thoughts in the comments below.

Create an account to write a response.

District Vision
Partner